रोटरी क्लब पाटसचा पदग्रहण समारंभ संपन्न

सचिन आव्हाड

रोटरी क्लब पाटसचा पदग्रहण समारंभ प्रमुख पाहुणे डॉ.अनिल परमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला .दौंड चे आमदार ॲड राहुल कुल यांचा आदर्श संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल क्लब तर्फे सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब बावधन च्या सेक्रेटरी अपर्णा महाजन व स्मिता शितोळे यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लब पाटसचे संस्थापक योगेंद्र शितोळे यांनी गावातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींना बरोबर घेऊन स्थापना केली.

या कार्यक्रमात डी.जी.इ. डॉ. अनिल परमार, ए.जी.भावना चाहुरे,ए.जी.महेश भागवत यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष उत्तम रुपनवर,सचिव अशोक बंदिष्टी,खजिनदार रामदास चव्हाण व सर्व संचालक आणि सदस्यासह पदग्रहण शपथ म्हणवून घेतली . नंतर सर्वांना रोटरी पीन लावण्यात आली क्लबचे माजी अध्यक्ष राजेश सोनवणे,सचिन पूजा दिवेकर, खजिनदार अजित शितोळे यांचा सन्मान करण्यात आला .

डॉक्टर अनिल परमार यांनी रोटरीच्या स्थापनेपासून आज पर्यंतची वाटचाल सांगितली व शुभेच्छा दिल्या आणि क्लबला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी उद्योजक अनिल शितोळे,डॉक्टर मधुकर आव्हाड, गायिका वैष्णवी चांदगुडे व बारामती,दौंड,पुरंदर,कुरकुंभ क्लबचे पदाधिकारी व संचालक,पत्रकार बंधु उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शितोळे तर आभार विश्‍वास अवचट यांनी मानले.

Previous articleआपण यांना पाहिलेत ?
Next articleअधिवेशन यशस्वितेसाठी आपला खारीचा वाटा उचलून जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने स्विकारावी –  एस एम देशमुख