आपण यांना पाहिलेत ?

दिनेश पवार , दौड

जनार्धन भिकोबा पाटोळे (वय 82 वर्षे रा.नानविज ता.दौंड जि.पुणे) हे राहते घरातून कोठेतरी कुणाला काही न सांगता निघून गेलेले आहेत.त्यांचा रंग गोरा,डोळ्यावर चष्मा, उजवा डोळा बारीक,उंची 5 फूट 5 इंच, नाक सरळ,चेहरा गोल,हातामध्ये लाकडी काठी,पांढरा तीन गुंड्याचा शर्ट,पांढरी कोपरी,पांढरे धोतर,डोक्यावर पांढरी टोपी, पायात काळ्या रंगाची चप्पल असा त्यांचा पेहराव, बोलीभाषा मराठी,असून वरील वर्णनाची व्यक्ती मिसिंग झाले बाबत नवनाथ सदाशिव शितोळे (रा.नानविज ) यांनी दौंड पोलिसांना खबर दिली आहे.जर वरील वर्णनाची व्यक्ती सदर कुणास कोठे आढळली तर दौंड पोलीस स्टेशन 02117-262333 किंवा सहाय्याक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गायकवाड 7218624871 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन दौंड पोलिसांनी केले आहे.

Previous articleसबनीस विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना किराणा किटचे वाटप
Next articleरोटरी क्लब पाटसचा पदग्रहण समारंभ संपन्न