वन्य जीव सप्ताह साजरा

श्रावणी कामत, लोणावळा

माजी विध्यार्थी संघ खंडाळा व इंडियन स्काऊट अँड गाईड लोणावळा गिल्ड तर्फेवन्य जीव सप्ताह संतघाडगे महाराज प्रा. शाळा. खंडाळा शा. क्र.10 व प्रा. रा मोरे , लनप माध्य खंडाळा येथे साजरा करण्यात आला .यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शना खाली वन परिमंडळ अधिकारी सागर चुटके यांनी मुलांना वन्यजीव विषयावर मार्गदर्शन केले मुलांशी सागर चुटके यांनी संवाद व चर्चा केली आणि परिस्थिती कशीही असो पण वेळेचा महत्व काय हे मुलांना पटवून दिले.कश्या प्रकारे तुह्मी वन्यजीव पासून आपले संरक्षण कसे करावे, यावर माहिती दिली. विद्यार्थी चर्चा सत्रात पूर्णपणे रमून गेले होते.

यावेळी वैजयंतीमाला म्हाळसकर मुख्याध्यापिका,हसीना सय्यद,सूर्यकांत खरात,सुचेता एखे,रत्नेशवर भुरे,सुनीता गावडे,अभंग आगलावे,अमृता पठारे ,अरुण इंगोले, डेबूजी झिग्रजी जानोटकर, माजी विद्यार्थी संघ खंडाळाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, राजेश महाडिक मंगेश येवले, अशोक गवारणे राजेंद्र ढाकोल, इंडियन स्काऊट अँड गाईड लोणावळा गिल्ड चेअध्यक्ष अशोक घाडगे,सुनिल शिंदे, रत्नप्रभा गायकवाड, पत्रकार श्रावणी कामत, आशिष जांगीर आदी मान्यवर उपस्थित होते

Previous articleखालापूर कारागृहात पुस्तक लायब्ररी व वाचनालयाचा शुभारंभ
Next articleसबनीस विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना किराणा किटचे वाटप