रोटरी डिस्ट्रिक ३१३१ लिटरसी कमिटीच्या वतीने शिक्षकांसाठी ‘स्मार्ट ऑनलाईन शिक्षण ‘ कार्यशाळेचे आयोजन

चाकण– समाज विकासाच्या कामात रोटरी क्लब या सेवाभावी संस्थेचे योगदान मोठे आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक, कला, जलसंवर्धन या क्षेत्रांत केलेले कार्य विशेष वाखाणण्याजोगे आहे. तळागाळातील समाजासाठी रोटरीतर्फे राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे.

कोविड -१९ च्या परिस्थितीने शिक्षणक्षेत्रात असा काही अचानक बदल घडवून आणला की ज्याचा परिणाम शिक्षक-विद्यार्थी यांच्यावर एकत्रितपणे झाला आहे.अचानकपणे उद्भवलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आत्मविश्वासने सामना करण्यासाठी एक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन रोटरी डिस्ट्रिक ३१३१ लिटरसी कमिटीच्यावतीने करण्यात येणार आहे. स्मार्ट ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी डिजिटल ,आयटी कौशल्ये वापरून ऑनलाईन अध्यापनासारखा एक अभिनव व स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.

हे प्रशिक्षण शिक्षकांना ऑनलाइन अध्यापनासाठी आवश्यक असलेल्या १५ महत्त्वपूर्ण डिजिटल ,आयटी कौशल्यांनी सुसज्ज करेल. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय संपूर्णपणे विनामूल्य असा हा कार्यक्रम आहे आणि शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्समार्फत तो राबविण्यात येणार आहे.सोप्या मराठी आणि इंग्रजी भाषेतून स्पष्ट केलेले डिजिटल,आयटी कौशल्यांचे छोटे व्हिडिओ व त्यावर आधारीत प्रश्नांचे व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांशी पाठविण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया सलग ५ दिवस चालेल. दररोज ३ नवीन कौशल्ये याप्रमाणे, शिक्षकांना ५ दिवसांत एकूण १५ कौशल्ये शिकविण्यात येणार आहे.

विविध रोटरी क्लबच्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.हे ऑनलाईन प्रशिक्षण सोमवार, १० ऑगस्ट २०२० पासून सुरू होईल आणि परीक्षा दिल्यानंतर रविवार,१६ ऑगस्ट २०२० रोजी संपेल व त्यानंतर शिक्षकांना त्यांच्या ई मेल वर प्रमाणपत्र प्राप्त होईल.
इच्छुकांनो, सहभागी व्हायचे असल्यास खालील लिंक वर जाऊन आपली नोंदणी करावी. https://rebrand.ly/registration-marathi-paper.
असे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रश्मी कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

Previous articleअण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त मरणोत्तर भारतरत्न प्रदान करा – खा.डॉ. अमोल कोल्हे
Next articleलांडेवाडी येथील श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयाने १७ वर्षे शंभर टक्के निकालाची दैदीप्यमान परंपरा जपली