खालापूर कारागृहात पुस्तक लायब्ररी व वाचनालयाचा शुभारंभ

श्रावणी कामत,खालापूर

सहजसेवा फाउंडेशन ही सातत्यपूर्ण उपक्रम समाजासाठी राबवित असते. समाजातील विविध घटकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमातुन समाजाची सेवा करणे हा संस्थेचा प्रमुख हेतू असतो.अनेक गुन्हेगार कारागृहात सजा भोगण्यासाठी येत असतात, अश्यावेळी रिकाम्या वेळात विचार करून भूतकाळात डोकावून वेळ घालविण्यापेक्षा विनोदी,प्रेरणादायी, अध्यात्मिक, कथा यासारखी पुस्तके वाचून प्रेरणा मिळावी व याचठिकानी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस स्टाफला देखील काही वेळ वाचन व्हावे या हेतूने सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून दसऱ्याच्या मुहूर्तावर दिनांक 15 ऑक्टोबर 2021 रोजी खालापूर कारागृहात विविध प्रकारची पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी व खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या हस्ते व नायब तहसीलदार कल्याणी कदम,खोपोली नगरपरिषदेचे गटनेता सुनील पाटील, खालापूर नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, के.टी.एस.पी.चे चेअरमन संतोष जंगम,एकनाथ पिंगळे,संदीप पाटील,सह्याद्री विद्यालयाचे अध्यक्ष नरेंद्र शाह,खालापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड,पोलीस उपनिरीक्षक बजरंग राजपूत
राजेश पाटील,राजेंद्र फक्के, डॉ.हेमा चिंबुळकर,दशरथ देशमुख,गणेश पाटील,दिनेश पाटील,विकी भालेराव,जनार्दन कदम व खालापूर पोलीस स्टेशनचे स्टाफ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा
इशिका शेलार,सचिव वर्षा मोरे,खजिनदार,संतोष गायकर,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुळकर्णी,कार्यवाह बी.निरंजन,उपक्रम प्रमुख प्रथमेश पाटील,बंटी कांबळे, आफताब सय्यद,योगिता जांभळे,अखिलेश पाटील,नकुल देशमुख,आयुब खान,आसमा पटेल,विशाल शिर्के,आसिफ खान,सुरेश खोपडे यांनी अथक सहकार्य लाभले.

दसऱ्याला सर्वत्र आपट्याची पाने अर्थात सोने वाटून हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. आज दसऱ्याच्या दिवशी सर्वांच्या अनन्य साधारण महत्त्व असणाऱ्या पुस्तकाच्या लायब्ररीचे उपक्रम मनाला आनंद देणारा आहे. संपुर्ण महाराष्ट्रभर विविध कारागृहात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे असे प्रतिपादन उपक्रम प्रमुख प्रथमेश पाटील यांनी केले.

विविध सामाजिक उपक्रमासाठी वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सामाजिक उपक्रमासाठी नोंद असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच समाजपयोगी कार्य होत असते अल्प काळासाठी कारागृहात येणारे कैदी व पोलीस स्टाफ यांना नक्कीच लायब्ररी व वाचनालयाच्या माध्यमातून मौलिक मदत होईल,असा आशावाद खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी केला.

सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून या स्तुत्य उपक्रमातून कारागृहात येणाऱ्या गुन्हेगारांना चांगल्या प्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिल्याने त्यांचे वाचन होत असताना मतपरिवर्तन व मनपरिवर्तन होईल,असा आशावाद खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी सांगितले.

Previous articleचाकणच्या अन्यायकारक कररचनेला स्थगिती देण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटणार- खासदार डॉ.अमोल कोल्हे
Next articleवन्य जीव सप्ताह साजरा