उरुळी कांचन मध्ये युवासेनेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

अमोल भोसले,उरुळी कांचन

युवासेनेच्या वर्धापनदिनानिमित्त उरुळी कांचन (ता.हवेली) येथील वैकुंठ स्मशानभूमीत आणि मुस्लिम समाज कबरीस्तान येथे शिवसैनिकांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.

या प्रसंगी युवासेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव विशाल सातव यांच्या प्रमुख उपस्थितीसह महिला तालुकाप्रमुख छायाताई महाडिक, उपतालुकाप्रमुख विजय बगाडे, विभागप्रमुख श्रीकांत मेमाणे, उपविभागप्रमुख सचिन कांचन, युवासेनेचे प्रताप कांचन, अल्पसंख्याकसेनेचे उपतालुकाप्रमुख खलिलभाई शेख, मा ग्रा सदस्य सचिन बडेकर, शिवाजी ननावरे, अतुल मोरे, शुभांगी बगाडे, नाना बगाडे, मयुर गोते, ऋषीकेश खेडेकर, दर्शन कांचन यांसह कबरस्तान कमिटीचे सदस्य फरहान मणियार, अॅड.सलमान मणियार, सैफुल शेख, युसुफभाई पठाण आणि शिवसैनिक उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर झालेल्या बैठकित बाळासाहेब कांचन, नितीन कांचन, कृष्णा कांचन, राजीव काळे यांनी शिवसैनिकांना आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूका संदर्भात संबोधित केले.

Previous articleमहाराष्ट्र साहित्य परिषद,शिरूर ग्रामीण वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
Next articleचाकणच्या अन्यायकारक कररचनेला स्थगिती देण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटणार- खासदार डॉ.अमोल कोल्हे