महाराष्ट्र साहित्य परिषद,शिरूर ग्रामीण वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

गणेश सातव, वाघोली

महाराष्ट्र साहित्य परिषद,शिरूर ग्रामीणच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ शिक्षण सल्लागार डॉ. अ. ल. देशमुख, संत साहित्य प्रबोधन केंद्राचे संस्थापक उत्तमराव भोंडवे, शिक्रापूरचे सरपंच रमेशराव गडदे आदी मान्यवरांच्या हस्ते 11 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कवी संमेलन,शिक्षक पुरस्कार,पुस्तक सन्मान असा बहारदार कार्यक्रम करण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणच्या वतीने घेण्यात आलेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ शिक्षण सल्लागार डॉ. अ. ल. देशमुख,संत साहित्य प्रबोधन केंद्राचे संस्थापक उत्तमराव भोंडवे, शिक्रापूरचे सरपंच रमेशराव गडदे आदी मान्यवरांच्या हस्ते 11 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. तसेच प्रतीक अशोक धुमाळ आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे तब्बल तेवीस वर्षांची परंपरा असलेल्या सुयश दिनदर्शिकेमार्फत विद्यार्थी आणि शिक्षकांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या संपादक के. डी. गव्हाणे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

संदीप वाघोले, तुषार सिनलकर, गुरुनाथ पाटील, कल्याण कडेकर , शांतीलाल ब्राह्मणे, डॅनियल मांडलिक, मंदाकिनी थिगळे, सतीश खेडेकर, शामराव चौधरी, नवनाथ काळे, शारदा मिसाळ आदी गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी शंकर नऱ्हे यांच्या वीर बाजी पासलकर, प्राध्यापक कुंडलीक कदम यांच्या शिदोरी, तर युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या वाघोबाचा मोबाईल या पुस्तकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर घेण्यात आलेल्या कविसंमेलनात व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या कविता उत्तमराव भोंडवे, सचिन बेंडभर, मनोहर परदेशी, संदीप वाघोले, आकाश भोरडे आदी कवींनी सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानाभाऊ गावडे यांनी केले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे ,राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनिल पलांडे,कवी व समीक्षक प्रा.विजय लोंढे प्रदीप गव्हाणे, संभाजी चौधरी, बाबा इनामदार, राहुल चातूर, संभाजी गोरडे, सुभाष कुरंदळे,बापू आसने,मीना म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव मांढरे यांनी केले तर आभार प्रा. कुंडलिक कदम यांनी मानले.

Previous articleखेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी रामदास रेटवडे तर सचिवपदी लतिफ शेख यांची फेरनिवड
Next articleउरुळी कांचन मध्ये युवासेनेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण