खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी रामदास रेटवडे तर सचिवपदी लतिफ शेख यांची फेरनिवड

राजगुरूनगर- खेड तालुक्यातील क्रीडा शिक्षक संघटना विशेष सर्वसाधारण सभेमध्ये २०२१ते२०२६ या पाच वर्षासाठी अध्यक्ष म्हणून रामदास रेटवडेसर तर उपाध्यक्ष नितीन वरकड सर व सचिव म्हणून लतिफ शेख व सह सचिव आण्णासाहेब कोडग यांची निवड करण्यात आली.

सभेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे महामंडळाचे कार्याध्यक्ष विश्वनाथ पाटोळे सर यांच्या निरिक्षका खाली निवडणूक बिनविरोध झाली.प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे माजी अध्यक्ष चिखले सर व दिलिप ढमाले उपस्थित होते.

या सभेला क्रीडा संघटनेचे एकूण पंच्चावन सभासदापैकी ५७ सभासद उपस्थित होते
सभेचे अध्यक्ष पाटोळे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये खेड ही माझी जन्मभूमी असून निवडणूक बिनविरोध करण्याची विंनती केली व जिल्हयातील प्रत्येक तालुक्यासाठी खेड तालुक्यातील क्रीडा शिक्षकाची हि निवडणूक आदर्श व प्रेरणादायी वाटावी असे अहवान केले त्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणात आपआपसात चर्चा करून पुन्हा एकदा फेरनिवड श्री रामदास रेटवडे सर व लतिफ शेख यांची फेर निवड करण्यात आली. तर नव्याने उपाध्यक्ष पदी नितीन वरकड सर व सहसचिव पदी आण्णा साहेब कोडग यांची निवड करण्यात आली
सभेत कुंडलिक गारगोटे विशाल ठाकूर , श्रशिकेश खोमणे सर , नामदेव पडदुणे सर संतोष जोशी सर वरकड सर, दिलीप ढमाले सर संतोष काळे सर ,ढाकणे सर मुख्याध्यापक मुठाळ तानाजी सर, मुख्याध्यापक निलिम कदम यांनी मनोगते केली

शिक्षकांच्या हितासाठी व विद्यार्थ्याच्या चांगल्या भविष्यासाठी तालुक्यात काम केले जाईल असे नुतन अध्यक्ष रामदास रेटवडे यांनी सांगितले . सूत्रसंचलन लतिफ शेख यांनी केले तर आभार संतोष काळे यांनी केले.

Previous articleहवेली तालका राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलच्या अध्यक्षपदी संतोष कांचन यांची निवड
Next articleमहाराष्ट्र साहित्य परिषद,शिरूर ग्रामीण वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान