हवेली तालका राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलच्या अध्यक्षपदी संतोष कांचन यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

येथील संतोष कांचन यांची हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.सदरची निवड पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी केली. शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संतोष कांचन यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, माजी सरपंच आण्णा महाडिक, रा.कॉग्रेस जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हा अध्यक्ष सोनबा चौधरी,मा.अध्यक्ष ह.ता.रा.यु.कॉग्रेसचे अर्जुन कांचन, उपसरपंच निलेश खटाटे, युवा नेते जयेश कांचन, प्रविण जुन्नकर आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरोगामी विचार तसेच सहकारातील योगदान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पक्षाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व सहकारी मार्गदर्शकांना बरोबर घेऊन पोचविण्याचे काम करणार असे नुतन सहकार सेलचे तालुका अध्यक्ष संतोष कांचन यांनी सांगितले.

Previous articleआईवडील व शिक्षकांच्या आशीर्वादामुळे अभिनेता ते नेता हा प्रवास यशस्वी- खासदार डॉ. अमोल कोल्हे
Next articleखेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी रामदास रेटवडे तर सचिवपदी लतिफ शेख यांची फेरनिवड