शिवजगदंब प्रतिष्ठानच्यावतीने नवरात्र महोत्सवनिमित्त रक्तदान शिबिर

पवनानगर -कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. दररोज रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने नातेवाईकांची धावपळ सुरु आहे, तर काहींना वेळेवर रक्त मिळत नसल्यामुळे जीव गमवावा लागत आहे.या परिस्थितुन सावरण्यासाठी व सामाजिक बांधिलकी म्हणून येलघोल येथील शिवजगदंब प्रतिष्ठाणने नवरात्र महोत्सवनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये 25रक्तपिशव्या संकलित केल्याची माहिती प्रतिष्ठाण चे खजिनदार प्रदीप घारे यांनी दिली.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्याना रक्त संकलन करणे आव्हानात्मक झाले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिक रक्तदानासाठी येत नसताना देखील प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी समाजात वेगळा आदर्श निर्माण केला. पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांनी येऊन रक्त संकलन केले . रक्तदानामध्ये तरुणांबरोबरच जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.

 मावळ तालुक्याच्या माजी सभापती निकिताताई घोटकुले येलघोल गावचे विद्यमान सरपंच पै. जयवंत घारे, शांताराम भरणे, नामदेव भिलारे, चंद्रशेखर कोंगे आदी उपस्थित होते.

Previous articleलखीमपुर हत्याकांडाचा निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोणी काळभोर येथे महामार्गावर निषेध मोर्चा
Next articleखालुब्रे गावातील ग्रामस्थांचा समाजासमोर नवा आदर्श