लखीमपुर हत्याकांडाचा निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोणी काळभोर येथे महामार्गावर निषेध मोर्चा

अमोल भोसले,उरुळी कांचन

लखीमपुर येथे झालेल्या हत्याकांडाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोणी काळभोर येथे महामार्गावर निषेध मोर्चा काढण्यात आला. लोणी काळभोर मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी शांततेत आंदोलन करून पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.

यावेळी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जिल्हा महिला अध्यक्षा भारती शेवाळे, जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हा अध्यक्ष सोनबा चौधरी, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, जिल्हा उपाध्यक्ष रामदास चौधरी, सरपंच विठ्ठल शितोळे, माजी सरपंच आण्णा महाडिक, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नंदु काळभोर, माजी उपसरपंच आप्पासाहेब काळभोर, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, प्रशासकीय माजी संचालक बाजार समिती बापुसाहेब बोधे, माजी उपसभापती सनी काळभोर, सरपंच सुरज चौधरी, ओबीसी तालुका अध्यक्ष सुभाष टिळेकर, विद्यार्थी तालुका अध्यक्ष सनि चौधरी, महिला तालुका अध्यक्षा लोचन शिवले, किसान सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास टिळेकर, माजी उपसरपंच रामभाऊ तुपे, राजेश वारघडे व मान्यवर उपस्थित होते.

Previous articleवारूळवाडी हद्दीत अनोळखी १९ ते २० वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला
Next articleशिवजगदंब प्रतिष्ठानच्यावतीने नवरात्र महोत्सवनिमित्त रक्तदान शिबिर