वारूळवाडी हद्दीत अनोळखी १९ ते २० वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला

नारायणगाव:- (किरण वाजगे)

नारायणगांव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वारूळवाडी हद्दीत पुणे  नाशिक बाह्यवळणावरील मीना नदीवरील नवीन पुलाखाली एक अनोळखी १९ ते २० वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास देशपांडे व पृथ्वीराज ताटे यांनी दिली .

या मुलीने गळफास घेतल्याचे दिसून येत आहे.मुलीचे वय अंदाजे १९ ते २० वर्ष, रंग सावळा, उंची ५ फूट, अंगात लाल रंगाचा व त्यावर सोनेरी रंगाची डिझाईन असलेला कुर्ता, व काळ्या रंगाचा धोती पायजमा त्यावर लाल रंगाची डिझाईन असलेला , उजव्या पायाच्या घोट्याजवल काळया रंगाचा धागा असलेला, उजव्या हाताच्या मनघटाच्या वर इंग्रजीमध्ये ‘रोहित’ असे गोंदलेले आहे.

वरील वर्णनाच्या मुलीबाबत काही माहिती मिळून आल्यास नारायणगाव पोलिस ठाण्याच्या ९८२११२२०६३, ९९२२४४८१०० या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे व पृथ्वीराज ताटे यांनी केले आहे.
दरम्यान आज दि. ११ रोजी दुपारी नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावरील मीना नदीच्या पुलाच्या कडेला एका झाडावर एका २० ते २६ वर्षे वयाच्या युवकाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

Previous articleवारुळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या शुभांगी कानडे यांचे सदस्यत्व रद्द
Next articleलखीमपुर हत्याकांडाचा निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोणी काळभोर येथे महामार्गावर निषेध मोर्चा