कळमोडीत डिजिटल सातबारा उताऱ्यांचे वाटप

राजगुरूनगर – सरकारी योजना आता आपल्या दारी या शीर्षकाअंतर्गत कळमोडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच हेमलता गोपाळे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा नागरिकांना देण्यात आला


बजरंग बोरकर यांच्या मार्गदर्शन खाली नेहरू युवा केंद्र आणि कळमोडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमान सहाय्याने महा श्रमदान ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावातील प्लास्टिक तसेच कचरा गोळा करण्यात आला.तलाठी संतोष साळोखे यांनी गावातील सर्व ग्रामस्थांना ई-पिक पाहणी संदर्भात मार्गदर्शन केले आणि सर्वांना त्यासाठी नोंद करून घेण्यास सूचना केल्या तसेच गावातील सर्व ग्रामस्थांना मोफत डिजिटल सात बारा वाटप करण्यात आले.कृषी अधिकारी सुधीर सुपे यांनी विविध शासनाच्या वयक्तिक लाभाच्या योजना तसेच वृक्षारोपण ,नैसर्गिक खत निर्मिती प्रक्रिया कशी केली जाते ह्याबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.


पुणे जिल्हाचे आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा अध्यक्ष अक्षय कामठे यांनी सर्व ग्रामस्थांना आपल्या आयुष्मान भारत योजना , ई श्रमिक कार्ड आणि शासनाच्या इतर योजनांची महित देऊन सर्व सामान्य ग्रामस्थांकडून त्या त्या योजनांची नोंदणी करून घेतली त्याचा त्यांना भविष्यात खूप मोठ्या प्रमाणत लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती वसंजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अरुण चांभारे इतर विषयांवर ग्रामस्थांना अतिशय उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन केले तसेच एक सकारात्मक भविष्यकाळात मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच कळमोडी गावासाठी भविष्यकाळात भरघोस निधी उपलब्ध करून देऊन गावाचा विकास कामात हातभार लावण्याचे आश्वासन दिले .

या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषद सभापती अणि संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अरून चांभारे, खेड तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुजाताताई पचपिंड ,तलाठी संतोष साळुंखे,कृषी अधिकारी सुधीर सुपे,कृषी पर्यवेक्षक प्रकाश पवार , ग्रामसेवक अर्चना भागवत , महसूल सहाय्यक दत्ताभाऊ देशमुख , नेहरू युवा केंद्र खेड बजरंग बोरकर , जिल्हा परिषद शाळा कळमोडी मुख्याध्यापक – पांडुरंग किसन बोराडे, शिक्षक संदिप गटे, ग्राम उत्कर्ष युवक मंडळ कळमोडीचे संस्थापक बजरंग गोपाळे,ग्राम उत्कर्ष युवक मंडळ कळमोडी अध्यक्ष – योगेश नवले, सामाजिक कार्यकर्ते दिनेश धंद्रे , सचिन गोपाळे , सरपंचचे कळमोडी हेमलता गोपाळे ,उप सरपंच दिगंबर बाबू गोपाळे , ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार अभंग,स्वाती गोपाळे,सुनीता गोपाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

शासनाच्या विविध योजनेची माहिती सर्व ग्रामस्थांना पर्यंत पोहचण्यास गावचे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांची मोलाची साथ लाभली

याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव गोपाळे यांनी केले तर आभार व्यक्त बजरंग गोपाळे यांनी

Previous articleमहा विकास आघाडी सरकारच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नारायणगावात उस्फूर्त प्रतिसाद
Next articleवारुळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या शुभांगी कानडे यांचे सदस्यत्व रद्द