शिरूर मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हनुमान मित्र मंडळांच्या वतीने नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा

अमोल भोसले

हनुमान नगर मित्र मंडळ व ट्रस्ट शिरूर गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात होता.

परंतु कोरोना महामारी चालू झाल्या पासून हनुमान नगर मित्र मंडळ व ट्रस्ट शिरूर गणेशोत्सव व नवरात्र उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचे मंडपाचे उभारणी न करता, कोणत्याही प्रकारचा देखावा, कार्यक्रमाचे आयोजन गेल्या काही वर्षापासून केले नाही.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नागरिकाकडून वर्गणी जमा न करता मंडळाचे पदाधिकारी स्वतः खर्च करून गणेश उत्सव व नवरात्र उत्सव साजरा करत आहे.

यावर्षी गणेशोत्सव काळात मंडळाने कोणत्याही नागरिकाकडून वर्गणी घेतली नाही,सर्व खर्च हा हनुमाननगर मित्र मंडळ व ट्रस्टचे शिरूर चे पदाधिकारी करत आहेत, गणेशोत्सव काळात सर्व नागरिकांना घरपोच पेढ्याच्या प्रसादाचे वाटप हनुमान नगर मित्र मंडळ व ट्रस्टने केले. हे खूप कौतुकास्पद आहे.

कालच नवरात्र उत्सव सुरू झाला, यावेळी घट स्थापना व देवीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली.

नवरात्र उत्सव काळात शिरूर शहरातील हनुमाननगर मध्ये घटस्थापना देवीची पूजा या सर्व कार्यक्रमाचे नियोजन हे सर्व हनुमान नगर परिसरातील माता-भगिनी करत असतात, दांडिया व गरभा चा कार्यक्रम होतो.

याही वर्षी हनुमाननगर शिरूर या भागात नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे,सर्व नियोजन महिला आनंदाने व उत्साहाने करून नवरात्र उत्सव साजरा करीत आहे.

मंडळाचे अनेक वर्षांची परंपरा चालू राहावी त्यात कोणताही खंड पडू नये. परंतु सामाजिक बांधिलकी जपत कोरोणाच्या पार्श्वभूमीवर हनुमान नगर मित्र मंडळ व ट्रस्ट कामगिरी खूप कौतुकास्पद आहे.

Previous articleअवैद्य गुटखा वाहतूक करणारा इसम स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात
Next articleपोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांपैकी एका ठगास अटक