ज्येष्ठ पत्रकार कॉ.सुभाष काकुस्ते यांच्यावरील हल्याचा पोलिसांनी छडा लावावा- एस एम देशमुख

गणेश सातव, वाघोली

साक्री तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते कॉ. सुभाष काकुस्ते यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून हल्ला केला, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने निषेध केला आहे. साक्री तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकजूट दाखवत पोलीस निरिक्षकांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली.

काकुस्ते हे पत्रकार आहेत आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते अशीही त्यांची ओळख आहे. सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधातील देशव्यापी लढ्यात काकुस्ते सहभागी असतात. ते आपल्या घरात असताना दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात घुसल्या आणि त्यांना मारहाण केली. किशोर ढमाले यांचा पत्ता दे अशी मागणी ते करीत होते.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या हल्ल्याचा तीव्र शब्दात धिक्कार करीत असून हल्लेखोरांचा पोलिसांनी तातडीने छडा लावावा अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक व अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

Previous articleशिक्षकाला शिवीगाळ करणाऱ्यावर कारवाई करा-गौतम कांबळे
Next articleअवैद्य गुटखा वाहतूक करणारा इसम स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात