शिक्षकाला शिवीगाळ करणाऱ्यावर कारवाई करा-गौतम कांबळे

दिनेश पवार,दौंड

मागासवर्गीय शिक्षकाला शिवीगाळ करून,धमकी दिल्याप्रकरणी वेल्हे येथील केंद्रप्रमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी केली आहे.

सदर घटनेबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की, दापोडे तालुका वेल्हे केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील मागासवर्गीय शिक्षकाला जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली .

याबाबत वेल्हा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून संबंधित केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .संबंधित शिक्षकाची कास्ट्राईब शिक्षक महासंघाकडेही तक्रार आली असून त्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग ,‌ शिक्षणाधिकारी प्राथमिक, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वेल्हे यांना निवेदन पाठवण्यात आले असल्याचे गौतम कांबळे यांनी सांगितले.

Previous articleफ्लॅटचे खरेदीखत करूनही ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल
Next articleज्येष्ठ पत्रकार कॉ.सुभाष काकुस्ते यांच्यावरील हल्याचा पोलिसांनी छडा लावावा- एस एम देशमुख