वडवणी तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा करण्यासाठी तिव्र आंदोलन करणार : एस.एम.देशमुख

अमोल भोसले

वडवणी शहरासह तालुक्यातील मोठे गाव असणाऱ्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा होण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची जनतेची मागणी असुन या बँकेच्या शाखा झाले तर सर्व सामान्य जनतेच्या अडचणी कमी होऊन विना त्रास काम होऊन आर्थिक झळ हि बसणार नाही तरी लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन यांनी तात्काळ शहरासह तालुक्यातील इतर गावात दोन, तीन ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा सुरू कराव्यात नसता मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सर्व राजकीय पक्ष,सामाजिक संघटनेना सोबत घेऊन यापेक्षा व्यापक व तिव्र आंदोलन करण्यात येईल असे रोखठोक विचार मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका यांच्या वतीने तहसील कार्यालया समोर काल दि.8 आँक्टोबर रोजी आयोजित केलेल्या एक दिवशीय लाक्षणिक उपोषण आंदोलनाच्या वेळी बोलताना मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले.

वडवणी तालुक्यातील गावाची संख्या व लोकसंख्या पहाता ग्राहकांच्या बँकेच्या व्यवहारासाठी असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा या शहरात स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक असुन ग्रामीण भागात हि कमी आहेत तरी राष्ट्रीयकृत बँकेच्या शहरासह तालुक्यात शाखा सुरू करण्यात यावेत या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या उपस्थितीत काल दि.8 आँक्टोबर शुक्रवार रोजी तहसील कार्यालया समोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना एस.एम.देशमुख म्हणाले की शहरात बँकेची शाखा एकच असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते यामध्ये बँकेत गर्दीमुळे वयोवृद्ध महिला मरण पाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यामुळे शहरासह तालुक्यातील देवडी, चिंचाळा,पुसरा, खडकी,देवळा यासह डोंगर पट्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखाचा विस्तार होण्याची आवश्यकता असुन यासाठी राजकीय पक्षाच्या व सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी या जिव्हाळ्याच्या प्रश्नी एकत्र येऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता असुन तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा करण्यासाठी केंद्रातील व राज्यातील मंत्र्यांना भेटुन सतत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाग पाडण्यात येईल. तसेच या उपर प्रशासनाने याची दखल न घेतल्यास यापुढे यापेक्षा व्यापक व तिव्र आंदोलन करण्यात येईल असे ते म्हणाले. मराठी पत्रकार परिषदेच्या या आंदोलनाला भाजप,शिवसेना, रा.काँग्रेस,आय काँग्रेस, रिपाई, मनसे, बहुजन विकास मोर्चा, सेवालाल सेना, सरपंच संघटना, यासह अनेकांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ,राज्य सदस्य अनिलराव वाघमारे, अँड. विनायक जाधव वडवणी तालुका अध्यक्ष, सुधाकर पोटभरे मा.अ.,सतिषराव सोनवणे सचिव, शांतीनाथ जैन कोषाध्यक्ष, ओमप्रकाश साबळे अध्यक्ष सोशलमिडिया,सतिषराव मुजमुले, रामेश्वर गोंडे, अविनाश मुजमुले, द्यानेश्वर वाव्हळ,हरी पवार, अंकुश गवळी, शंकर झाडे,महेश सदरे, अर्जुन मुंडे, वाजेद पठाण, रामेश्वर टिपरे,सुर्यकांत सावंत, हनुमंत मात्रे,शेख एजाज,हरिदास उंडाळकर, धम्मपाल डावरे, अतुल राऊत ,ओमप्रकाश पुरी,श्रीकांत जोशी, सलमान पठाण, पांडुरंग जोशी, भागवत सावंत, अनिल कदम,सुशिल जावळे, रघुनाथ जावळे, एन.के.उजगरे, बप्पासाहेब भांगे यासह असंख्य पत्रकार उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार पत्रकार सतिषराव मुजमुले यांनी केले.

जिव्हाळ्याच्या प्रश्नी अनेकांनी दिला पाठिंबा.

भाजपा नेते रमेशराव पोकळे, सोमनाथराव बडे, दादासाहेब मुंडे , श्रीराम बादाडे मनसे बीड जिल्हा अध्यक्ष ,बन्सीभाऊ मुंडे जेष्ठ नेते भाजप, संजय भाऊ आंधळे सरपंच संघटना ता.अध्यक्ष, बाबरी मुंडे भाजपा नेते,महादेव उजगरे रिपाई तालुका अध्यक्ष,बी.एम.पवार सेवालाल सेना अध्यक्ष, संदीप माने शिवसेना ता.प्रमुख वडवणी, विनायक मुळे मा.शिवसेना ता.प्र.,अँड. सचिन आवचर,बालासाहेब राऊत सरपंच,नागेश डीगे शिवसेना शहर प्रमुख, विष्णू टकले शिवसेना नेते, अँड. विष्णू उजगरे आय काँग्रेस ता.सचिव,ओमराजे जाधव शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख वडवणी,बाबासाहेब वाघमारे बहुजन विकास मोर्चा, दिपक अंबुरे,बद्रीनाथ साबळे चेअरमन,धनंजय जाधव,युवराज खळगे, भागवत वाघमारे, दिनेश नाईकवाडे, शंकर जाधव,पंडीत उजगरे, संजय साळवे, अविनाश साळवे, चिमन दुटाळ, भाई महादेव उजगरे, चंद्रकांत चाटे,राजु वाघमारे, बद्रीनाथ व्हरकटे सरपंच, प्रकाश जोगदंड उपसरपंच, मधुकर ठोसर राष्ट्रीय चर्मकार महासंघ वडवणी तालुका अध्यक्ष, बंडु नाईकवाडे, सुग्रीव मुंडे, अविनाश थेटे राष्ट्रवादी काँग्रेस,रामनाथ देशमुख सरपंच, सुधीर पोकळे ,धनराज मुंडे युवा नेते, वचिष्ठ शेंडगे शिवसेना नेते, प्रविण पवार, मयूर बडे,धनराज खळगे, दत्तात्रय राठोड, शाम उजगरे,यासह राजकीय पक्षाचे ,सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते,यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला.

Previous articleशिक्षण महर्षी स्व. तात्यासाहेब गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गुंजाळ कुटुंबातील सदस्यांनी अवयवदानाचे भरले फॉर्म
Next articleप्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार ! प्रकल्पग्रस्तांच्या आढावा बैठकीत महेश पासलकर यांचे आश्वासन !