वीस महिन्यांनंतर गावात आली एसटी : वाकळवाडीकरांनी एसटी चालक,वाहकाचा केला सत्कार

राजगुरूनगर- खेड तालुक्यातील वाकळवाडी येथे लाँकडाऊन पासून एसटी महामंडळाने (मार्च 2020 ते ऑक्टोबर 2021) सलग वीस महिने एसटी बस सेवा बंद केली होती.कोरोनाचे संकट हळूहळू कमी होऊ लागले.त्यामुळे एसटी बस सेवा चालू होऊ लागली.

तब्बल वीस महिन्यांनी एसटी बस सेवा चालू झाल्यामुळे वाकळवाडी गावातील ग्रामस्थांनी हार घालून एसटीची पुजा केली.तसेच चालक किसन सावळे व वाहक सौ. भिसे यांचा सत्कार केला.

यावेळी भरत पवळे, बाळासाहेब वाळुंज, साहेबराव पवळे,गणपत पवळे,सुदाम शेवाळे, शिवाजी सुके, मारूती कोरडे, चंद्रकांत कोरडे, विशाल सांडभोर, अतुल पवळे, पंडित वाळूंज, शंकर कोरडे,गौरव भंडलकर, रोहित शिंदे,पप्पू शेवाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

एसटी बस सेवा चालू झाली असली तरी अजून पुर्ण पणे संकट टळले नाही. प्रवाशांनी तोंडाला मास्क वापरुन सुरक्षित अंतर ठेवूनच एसटी बसने प्रवास करावा असे सामाजिक कार्यकर्ते संदीप गावडे यांनी सांगितले.

Previous articleगावागावात पेसा हक्क कृती समितीची स्थापना करून लोकशाही मार्गाने न्याय मिळविला जाईल – भरतशेठ फदाले
Next articleज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वितरण