दौंड मध्ये कोरोना चे 9 रुग्ण पॉजिटिव्ह

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड शहरामध्ये पुन्हा नऊ रुग्ण पॉजिटिव्ह आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली,उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक-29 जुलै 2020 रोजी एकूण 30 जणांचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचे रिपोर्ट आज दिनांक 30 जुलै रोजी प्राप्त झाले यामध्ये 30 पैकी 21 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर 9 जणांचे रिपोर्ट पॉजिटिव्ह आले आहेत

या रिपोर्ट मध्ये महिला– 3 तर पुरुष 6 असा समावेश आहे,यामध्ये पाटील चौक-1,बांगला साईड-1,नेहरू चौक-1,शालिमार चौक-1,गजानन सोसायटी-1,जनता कॉलनी-1,जगदाळे वस्ती-1,गोपाळवाडी-1,भवानी नगर-1 या भागामध्ये हे रुग्ण सापडले असून हे सर्व 18 ते 75 या वयोगटातील आहेत.

दौंड शहरातील कोरोना परिस्थिती कधी दिलासादायक तर कधी चिंताजनक स्वरूपाची होत आहे, काल दिवसभरात कोरोना रुग्ण एक सापडल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला होता परंतु आज ही वाढती संख्या काळजी निर्माण करणारी आहे
परंतु नागरिकांनी काळजी घेतल्यास,मास्क वापरल्यास,पोलीस प्रशासनाने दिलेले नियम,आरोग्य विभागाने सांगितलेल्या महत्वपूर्ण बाबी आचरणात आणल्यास दौंड मधील कोरोना नक्कीच संपुष्टात येईल,म्हणूनच नागरिकांनी काळजी घ्यावी,सतर्क रहाणे महत्वाचे आहे