झेडप्लस, कस्तुरी हॉस्पिटल, एच. व्ही. देसाई नेत्र रुगणालय यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

झेड प्लस व कस्तुरी हॉस्पिटल, एच. व्ही. देसाई नेत्र रुगणालय, महमदवाडी नेत्र तपासणी केंद्र उरुळी कांचन यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ७० जणांची तपासणी करण्यात आल्याची माहिती कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी दिली. वळती (ता. हवेली ) येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील सभा मंडपात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन वळती गावचे सरपंच एल. बी. कुंजीर व कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

वळतीचे सरपंच सरपंच एल. बी. कुंजीर, कस्तुरी प्रतिष्ठान उरुळी कांचन, वळती ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या सौजन्याने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नेत्ररोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, ई.सी.जी. तपासणी, हृदयरोग तपासणी, रक्तगट तपासणी, गरोदर माता व स्त्रीरोग तपासणी व मार्गदर्शन, कान, नाक, घसा तपासणी, तसेच गुडघेदुखी व मणक्याचे आजार या तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या आहेत.

या तपासणीत उरुळी कांचनसह वळती गावातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी झेडप्लस व कस्तुरी हॉस्पिटलचे डॉक्टर दिलीप झेंडे, नेत्ररुग्णालयाच्या डॉक्टर तेजस्विनी सिंग, उपसरपंच जितेंद्र कुंजीर, पोलीस पाटील मोहन कुंजीर, ग्रामसेविका उज्वला हिंगणे, शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रताप कुंजीर, प्रसाद कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर, जीवन कुंजीर, शंकर पाटील, प्रदीप कुंजीर, मारुती कुंजीर, पांडुरंग कुंजीर, शंकर कुंजीर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleमंदिरे उघडणार असल्यामुळे श्रीक्षेत्र ओझर येथे भाविक, व्यापाऱ्यांमध्ये उत्साह
Next articleमावळ तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा