मराठी साहित्य मंडळाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

अमोल भोसले,पुणे

मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात सरकारमान्य संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या वर्षी हे संमेलन सातारा जिल्ह्यामधील म्हसवड शहरामध्ये शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कथा, कविता, कादंबरी, आत्मचरित्र, या चारही गटातील राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न आणि साहित्यभूषण पुरस्कार देण्यात येणार आहेत.तसेंच राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न आणि समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तरी इच्छुक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि कवी लेखकांनी आपला प्रस्ताव, दोन फोटो, परिचय पत्रासाहित दिनांक १५ ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव खाली नमूद केलेल्या पत्यावर पाठवून द्यावेत असे आवाहन जेष्ठ साहित्यीक डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी केले.

तसेच लेखक आणि कवींनी दिनांक १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्यच पाठवावेत.

सदरील पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती, दोन फोटो आणि परिचय पत्र दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ पर्यत मराठी साहित्य मंडळ , मुंबई प्रदेश कार्यालय,नीलकंठ बिल्डिंग, पहिला मजला, गाडगीळ ज्वेलर्स समोर, राम मारुती रोड, ठाणे(पश्चिम) या पत्यावर पाठवावेत असे आवाहन मराठी साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे आणि राष्ट्रीय सरचिटणीस ज्येष्ठ लेखिका नीलिमा जोशी यांनी केले आहे

Previous articleयुवा सेनेचे जिल्हा समन्वयक निलेश मेमाणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
Next articleमंदिरे उघडणार असल्यामुळे श्रीक्षेत्र ओझर येथे भाविक, व्यापाऱ्यांमध्ये उत्साह