जुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१५ वर पोहचली;नारायणगाव मध्ये आज पाच रुग्ण निष्पन्न

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांंची संख्या आज ४१५ झाली आहे. आज तालुक्यामध्ये एकूण पंधरा कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

तालुक्यातील नारायणगाव येथे आज तब्बल ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, राळेगण येथे दोन, तर वडगाव कांदळी येथे तीन तसेच वडज, ठिकेकरवाडी जुन्नर, बस्ती व तेजुर येथे प्रत्येकी एक असे एकूण १५ रुग्ण आढळले आहेत.

आज एकूण ४१५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असताना यापैकी तालुक्यातील २५१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४९ एवढी झाली आहे. तर आजपर्यंत तालुक्यातील १५ जणांचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे. एक उल्लेखनीय बाब म्हणजे दररोज कोरोना पासून बरे होणा-यांची संख्या वाढत आहे.
दरम्यान सर्व नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे व प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.