युवा सेनेचे जिल्हा समन्वयक निलेश मेमाणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

योगेश राऊत ,पाटस

दौंड तालुक्यातील केडगाव येथील युवा सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक निलेश शिवाजीराव मेमाणे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त केडगाव येथे रक्तदान शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, नागरिकांची कोरोना अँटीजन तपासणी तसेच कोरोना काळात केडगाव येथे कोविड सेंटर चालवणारे डॉक्टर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शिक्षिका या सर्वांना कोविड योद्धा पुरस्कार देण्यात आले.यावेळी 51 जणांनी रक्तदान करीत या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला.

यावेळी या सर्व रोग निदान शिबिराचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर व युवा सेनेचे राज्य विस्तारक गणेश कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी हे पुरस्कार युवा सेनेचे राज्य विस्तारक गणेश कवडे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते कोवीड योद्ध्यांना पुरस्कार देण्यात आले.

यावेळी युवा सेनेचे राज्य विस्तारक गणेश कवडे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर, युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख योगेश फडके, युवा सेनेचे तालुका प्रमुख समीर भोईटे, तालुका समन्वयक सागर शेलार, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख विजयसिंह चव्हाण,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पद्माकर देशमुख, बोरिपर्धी चे सरपंच सुनील सोडनवर, वरद विनायक हॉस्पिटल चे डॉक्टर सचिन भांडवलकर, तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ, शिवसेना विभाग प्रमुख हनुमंत निगडे, युवा नेते प्रशांत जगताप, सामाजिक कार्यकर्ते शंकरराव शितोळे, अमोल जगताप, उपविभाग प्रमुख राहुल फडके,यासह आदी मान्यवर व युवा सेना शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleराजगुरूनगर मध्ये अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाला अटक : २ लाख ८१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
Next articleमराठी साहित्य मंडळाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन