पिंपळगाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रंगनाथ गुळवे

नारायणगाव,किरण वाजगे

पिंपळगाव तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रंगनाथ उर्फ श्रीधर नानासाहेब गुळवे यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी जयेश खांडगे तर सचिवपदी महेश खांडगे यांची नियुक्ती करण्यात आली.नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली.


याप्रसंगी सरपंच माधुरी वऱ्हाडी, उपसरपंच सोपानराव खांडगे, ग्रामपंचायत सदस्य अरुण वऱ्हाडी, सचिन लोखंडे, आशा चव्हाण, जयश्री खांडगे, सुनंदा बोऱ्हाडे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष गुणवंतराव गावडे, गौतम लोखंडे, माजी उपसरपंच पंकज वऱ्हाडी, सुरेश वाणी, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रमोद खांडगे, श्रीकृष्ण पतसंस्थेचे चेअरमन राजेश गावडे, प्रशांत चव्हाण, सचिन वाणी, बाबु गावडे, राजेश खांडगे, अनंतराव खांडगे, संभाजी गुळवे, राकेश चव्हाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

लागोपाठ तिसऱ्यांदा निवड झाल्याने गावात पूर्वीप्रमाणेच सातत्याने शांतता व सलोखा राखण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन निवड झाल्यानंतर रंगनाथ गुळवे यांनी दिले.

दरम्यान त्यांच्या निवडी बद्दल जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर चे संचालक संतोष नाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, भाजपचे माजी जिल्हाउपाध्यक्ष नामदेव अण्णा खैरे, पवन गोसावी यांनी गुळवे यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleनवरात्री निमित्ताने डॉ. संजीव करंडे यांच्या तर्फे विविध आरोग्य उपक्रम
Next articleनवरात्री निमित्ताने डॉ. संजीव करंडे यांच्या तर्फे विविध आरोग्य उपक्रम