महसूल विभागाच्या वतीने विविध दाखल्यांचे खासदार डॉ.अमोल कोल्हें यांच्या हस्ते वाटप

नारायणगाव (किरण वाजगे)

संसदरत्न खासदार डॉ अमोल रामसिंग कोल्हे खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठाण आयोजित मोफत कोविड लसीकरण शुभारंभ तसेच आंबेगाव तहसील कार्यालय येथील महसूल विभागाच्या वतीने विविध दाखल्यांचे वाटप स्वतः खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये मोफत सातबारा वितरण, रेशन कार्ड, संजय गांधी व श्रावणबाळ योजना मंजूर प्रकरणातील लाभार्थी, ई पीक पाहणी प्रशिक्षण कार्यक्रम असे कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभपती देवदत्त निकम, सुभाष मोरमारे, भिमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील, आंबेगाव पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, आंबेगाव पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे, जयसिंग काळे, विष्णूकाका हिंगे, घोडेगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अक्षय काळे आदी मान्यवार याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी डॉ अमोल कोल्हे यांनी महसूल विभागाने सुरू केलेल्या मोफत सातबारा वितरण कार्यक्रम, ई पीक पाहणी या उपक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या जमिनींची नोंदणी व्यवस्थित व काटेकोर करून घ्यावी असे आवाहन केले.

या वेळी कोविड काळात घोडेगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सोमनाथ काळे यांनी उल्लेखनिय कार्य केले. ते कार्यक्रमाला आले नव्हते. मात्र डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रत्यक्ष त्यांची भेट घेवून त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली व त्यांना शाबासकीची थाप पांठिशी देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

Previous articleकोरेगाव मुळमध्ये चोरट्यांनी केले २ लाख ५७ हजार रुपये लंपास
Next articleयशवंतचे धुराडे पुन्हा पेटणार : आमदार अशोक पवार