आमदार अशोक पवार यांच्या हस्ते शेतकरी मासिकांचे वाटप 

अमोल भोसले,उरुळी कांंचन

मौजे प्रयागधाम येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमांमध्ये आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नायगाव येथील शेतकऱ्यांना शेतकरी मासिक वाटप करण्यात आले.

यावेळी सोरतापवाडी गावचे युवा नेते अमित चौधरी, नायगावचे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चौधरी, कोरेगावमूळचे ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेधे, नायगावचे सरपंच गणेश चौधरी, पेठ गावचे सरपंच गणेश चौधरी उपस्थित होते.

महिन्याला २५ रुपये किंमत असलेले शेतकरी  वार्षिक वर्गणी २५०रुपये या सवलतीच्या दरात उपलब्ध असून ते घर पोहोच मिळते व त्यामध्ये शासकीय योजना, पिकांबद्दल माहिती अशी महत्त्वाची माहिती असल्याने त्याचा शेतीसाठी खूप फायदा होतो असे प्रतिपादन नायगाव चे प्रगतिशील शेतकरी सुहास चौधरी यांनी केले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतकरी मासिकाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी केले. यावेळी कृषी सहाय्यक महेश सुरडकर, शंकर चव्हाण, महेश महाडिक, अमित साळुंखे उपस्थित होते.

Previous articleडंकन कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीच्या करारनाम्यावर शिक्कामोर्तब
Next articleगावठी पिस्तूलासह दोघे जेरबंद