पुरोगामी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी सुभाष कदम यांची निवड

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

पुरोगामी पत्रकार संघाच्या दौंड तालुका अध्यक्ष पदी दैनिक सार्वमतचे पत्रकार सुभाष कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,पुणे जिल्हा संघटक पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांनी सुभाष कदम यांना निवडीचे पत्र दिले.

पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष -मा.विजय सूर्यवंशी,उपाध्यक्ष-मा.श्री.डॉन एन. के.के.,सचिव- मा.श्री.प्रवीण परमार,खजिनदार- मा.श्री.राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोगामी दौंड पत्रकार संघ कार्यरत राहणार आहे, पत्रकारांचे,समस्या, मागणी,हक्क,संरक्षण यासाठी कार्य करणार असल्याचे सुभाष कदम व राजेंद्र सोनवलकर यांनी सांगितले
यावेळी पत्रकार हरिभाऊ क्षीरसागर, मा.प्रदीप सूळ, मा.संदीप दादा बारटक्के,मा.विलास कांबळे,मा.विठ्ठल शिपलकर,मा.जोगदंड यावेळी उपस्थित होते

Previous articleचाकण नगरपरिषदेच्या मुख्यधिकारीपदी डॉ.नीलम पाटील यांची पुन्हा नियुक्ती
Next articleपुरोगामी माध्यमिक विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्या मंदिराचा दहावीचा निकाल शंभर टक्के