भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अमर बो-हाडे यांची नियुक्ती

राजगुरूनगर- खेड तालुक्यातील वाफगाव येथील भाजपचा कार्यकर्ता अमर बो-हाडे यांची भारतीय जनता पार्टी अनुसुचीत जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे अनुसुचीत जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर भालेकर यांनी हि नीयुक्ती केली.

भाजपामध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. अमर बो-हाडे यांनी आज पर्यत अ.जा.मोर्चा जिल्हा सरचिटणीस ,दोन वर्षे पक्ष विस्तारक म्हणून काम केले आहे. तसेच पक्षाच्या संघटनात्मक काम करत दहा जिल्ह्याचा दौरा टू व्हीलर वर केला आहे तसेच सध्या लातुर जिल्हा प्रभारी आहे. पंचायत समितीची निवडणुक लढवली आहे ,पक्षाने दिलेली जबाबदारी अनुसूचित जातीतील व इतर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच पक्ष वाढीसाठी व पक्षाचे वीचार आचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र भर प्रवास करणार आहे.माझ्या सारख्या तरूण कार्यकर्त्यांला दीलेल्या संधीचे सोने करणार असल्याचे सांगितले तसेच कोणताही राजकीय वारसा नसताना पक्षाने महाराष्ट्रत काम करण्याची संधी दिली आहे सामान्य कार्यकर्त्यांची पक्षाकडुन दखल घेतली जाते तसेच भारतीय जनता पार्टी ही स्वतः आई प्रमाणे जपणारा पक्ष आहे व माझे आयुष्य संपूर्ण वेळ भारतीय जनता पार्टीच्या पक्ष वाढी साठी व पक्ष संघटनात्माक कामी तसेच नागरीकांच्या न्याय हक्कासाठी तसेच अनुसूचित जातीच्या लोकांच्या हितासाठी संपूर्ण जीवन कार्य करणार आहे असे अमर बो-हाडे यांनी सांगितले

Previous articleअखिल भारतीय मराठा महासंघाच्या जुन्नर तालुका तालुकाध्यक्षपदी अतुल भांबेरे ,कार्याध्यक्षपदी गौतम औटी
Next articleमैदानी स्पर्धेमध्ये मदने दांपत्याची गगन भरारी