चाकण नगरपरिषदेच्या मुख्यधिकारीपदी डॉ.नीलम पाटील यांची पुन्हा नियुक्ती

Ad 1

चाकण : येथील नगरपरिषदेच्या मुख्यधिकारीपदी डॉ. नीलम पाटील पुन्हा नियुक्ती झाली आहे. मॅट न्यायालयाने त्यांची पुन्हा नियुक्ती करावी, असे आदेश शासनाला दिला आहे.

डॉ.पाटील यांची बदली झाल्याने सात जुलै रोजी मुख्याधिकारी म्हणून नानासाहेब कामठे यांनी पदभार स्वीकारला होता. परंतु डॉ.पाटील या मॅट न्यायालयात गेल्या असल्याने त्यांच्या बाजूने निकाल आल्याने त्या पुन्हा पदभार स्वीकारणार आहेत.

डॉ.पाटील यांच्यावर पोलिस ठाण्यात अँँट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यात त्यांना जामीनही मिळाला आहे. त्यांच्या विरोधात नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांची कारकीर्द वादळी ठरली होती. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार डॉ.पाटील यांचा चाकणचा पदभार काढला होता. त्यामुळे त्या मॅटमध्ये गेल्या होत्या. मॅटच्या आदेशानुसार पुन्हा त्यांनी चाकणचा पदभार स्वीकारला. दरम्यान, डॉ.पाटील या मुख्यधिकारी म्हणून पुन्हा जबाबदारी सांभाळत असल्या तरी बहुतांश नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी आमदार सुरेश गोरे व काही नगरसेवक त्यांच्या बदलीसाठी नगरविकास मंत्र्यांना भेटले होते, पण काही उपयोग झाला नाही.