कडूस क्रिकेट अकॅडमी व शिरूर स्पोर्ट क्लब ची आगेकूच

राजगुरुनगर – योगेश धायबर क्रीडा संकुल कडूस येथे सुरु असलेल्या एकोणीस वेषांखालील स्व संतोष कालेकर चषक क्रिकेट स्पर्धेत कडूस क्रिकेट अकॅडमी व शिरूर स्पोर्ट क्लब या संघांनी प्रतिस्पर्धांचा पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला .

 सलामीच्या लढतीत पार्थ बाफना (१००) याने केलेल्या शतकाच्या जोरावर शिरूर स्पोर्ट संघाचा एका धावेने पराभव केला.

 पहिल्यांदा खेळताना पार्थ बाफना १००, स्वरूप गलांडे ११ यांनी केलेल्या धावांच्या जोरावर शिरूर स्पोर्ट क्लबने २० षटकांत ७ बाद १७४ धावा केल्या . योगेश टोपे (२/३६) व आकाश साळुंके (२/२२) गडी बाद केले .याच्या उत्तरात सस्ते झील स्पोर्ट क्लब ने २० षटकांत ४ बाद १७३ धावा केल्या. अक्षित इंगळे (९२), शुभम के (४३) व सिद्धेश खिलारी (३०) धाव केल्या. आनंद कुलथे (२/२७) गडी बाद केले.

सामन्याचा मानकरी पार्थ बाफना ठरला . दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या सामन्यात सुशील आहेर (३८) व सिद्धेश खिलारी (१७) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर

सस्ते झील स्पोर्ट क्लब ने १७ शतकांत ९ बाद ११३ धाव केल्या. कडूस क्रिकेट अकॅडमी च्या संकेत मालकर (३/२७) व चैतन्य नीलकंठ ने (३/२८) गडी बाद केले. याच्या उत्तरात कडूस क्रिकेट क्लब ने १५.२ षटकांत ६ बाद ११४ धावा करून हे आव्हान पूर्ण केले. आकाश साळुंके (२/२७) व संकेत मोसे (२/२७) गदि बाद केले.

आदित्य वाळुंज (२७) व मोहित यादव (१९) धावा काढून विजय मिळवून दिला.संकेत मालकर सामन्याचा मानकरी ठरला.

स्पर्धेचे आयोजन श्री ललित मुसळे यांनी केले आहे तर उदघाटन योगेश धायबर व ललित मुसळे यांनी केले.

Previous articleसावरदरीत विक्रमी 1223 लोकांचे लसीकरण
Next articleकडूस क्रिकेट अकॅडमी व शिरूर स्पोर्ट क्लबची आगेकूच