चौधरी पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलची दहावीच्या १००% निकालाची हॅटट्रिक

Ad 1

राजगुरुनगर-संत ज्ञानेश्वर विद्या प्रतिष्ठान संचालित, चौधरी पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, खरपुडी ता. खेड जि. पुणे या शाळेचा सन २०१९-२०२० च्या तिसऱ्या बॅचचा दहावीचा १००% निकाल लागल्याने निकालाची हॅटट्रिक झाली.

सन २०१९-२०२० मध्ये इयत्ता १० वी चे ४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामध्ये प्रथम क्रमांक भोसकर केतन तुकाराम (९४.८०%), दुसरा क्रमांक कु. गुंडाळ तृप्ती विष्णू (९३.००%), तिसरा क्रमांक पवळे तेजस जयसिंग (९२.२०%), चौथा क्रमांक कु. सोनवणे विद्या कमलाकर (९१.२०%) ,पाचवा क्रमांक शिंदे प्रज्वल कानिफनाथ (९१.००%) व सहावा क्रमांक चौधरी अथर्व रविंद्र (९०.६०%) याने पटकावला.

स्कॉलरशिप व नवोदय प्रवेश परिक्षेच्या उत्तुंग यशाबरोबर सलग तिसऱ्या वर्षी १० वी चा १००% निकाल लागल्याने पालक शिक्षक व विद्यार्थी आनंदित झाले. १० वी च्या निकालाची हॅटट्रिक झाल्याचा आनंद स्कूलच्या शिक्षकवृदांनी सोशल डिस्टंसिंगने फाटके वाजवून तसेच पेढे वाटून व्यक्त केला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. के.डी.चौधरी पाटील यांनी स्कूलमध्ये यशवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व मागर्दशक शिक्षकांना, गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सन्मानित केले!

या प्रसंगी स्कूलच्या व्हाईस प्रिन्सिपल सौ.रोहिणी गव्हाणे, संस्थेच्या सचिव सौ. आशालता चौधरी पाटील, शिक्षकवृदं ,शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.