दुचाकी चोरी होऊ नये म्हणून करा “हा” सर्वात स्वस्त उपाय

चाकण- आपल्या एरियात गुन्ह्याचे प्रमाण व्हावे म्हणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक ठाणेदार प्रयत्न करत असतात .याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे चाकण पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रजपूत आणि पोलीस निरीक्षक अनिल देवडे आणि त्यांचे सर्व शिलेदार .आज पुणे जिल्हा आणि परिसरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढत आहे चोऱ्या करणारे गाडीचे हँडल लॉक सहज तोडून डुप्लिकेट चावीने गाडी चालू करून चोऱ्या करत आहेत .चोऱ्यांच्या या प्रकारामुळे सामान्य जनतेला नाहक आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास सोसावा लागत आहे तर पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढत आहे.चोरी झालेली गाडी लवकर मिळेलच याची शाश्वती नाही जर एखाद्या टोळीचा कुणी साथीदार पोलिसांच्या ताब्यात सापडला तरच त्यांनी चोऱ्या केलेल्या गाड्या मिळण्याची शक्यता असते.

परंतु तोपर्यंत गाडी आणि गाडीचे मालक सुस्थितीत असतीलच हे मात्र कुणी सांगू शकत नाही.यावर उपाय म्हणजे गाडी मालकांनी स्वतःच आपल्या गाडीची सुरक्षितता करणे.त्यासाठी कोणत्याही आटोमोबाइल च्या दुकानात मिळणारे लॉक हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो हे लॉक लावल्याने चोरांना गाडी उचलून नेऊन चोरी करण्याशिवाय पर्याय नाही .किंवा लॉक लावलेले चाक काढून दुसरे चाक लावून गाडी चोरून नेणे तर सर्व नागरिकांनी आपापल्या गाडीची सुरक्षितता जपावी असे आवाहन चाकण पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले.

पोलीस निरीक्षक अनिल देवडे(गुन्हे) API विक्रम गायकवाड,API पूनम जाधव,आणि डिटेक्शन ब्रँच चे PSI विजयकुमार जगदाळे यांनी प्रथम स्वतःच्या वाहनांना हे कुलूप लावून घेतले तसेच त्यांच्या अमलदारांनी आपापल्या वाहनांना हे कुलूप लावून घेतले.सामाजिक कार्यकर्ते पोलिसमित्र बापूसाहेब सोनवणे यांच्या संकल्पनेतून या आधी दौंड पोलीस स्टेशनला देखील उपक्रम राबविण्यात आला होता आज चाकण पोलीस स्टेशनला देखील त्यांनी सर्वोतोपरी सहकार्य केले चाकण पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

Previous articleसंसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुर लोकसभा मतदारसंघातील 5 लाख नागरिकांसाठी मोफत लसीकरण
Next articleदिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार- आमदार अॅड. राहुल कुल