आलेश्वर विद्यालयाची निकालाची उज्वल परंपरा कायम,10 वी चा निकाल 97.50 टक्के

दिनेश पवार-दौंड (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा आलेश्वर विद्यालयाचा निकाल 97.50%लागला असून गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे
प्रथम:-कु.सातपुते साक्षी राजेंद्र-90%
द्वितीय:-कु.निकम अनिशा संजय-89.60%
तृतीय:-कु.एकाड माया नारायण-87.60%
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे
सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री आप्पासाहेब पवार उपाध्यक्ष आनंदराव गिरमकर सचिव हरिश्‍चंद्र ठोंबरे व संस्थेचे सर्व संचालक शाळेचे मुख्याध्यापक श्री घोलप सर आणि आलेगाव चे सरपंच सर्व सदस्य चेअरमन संचालक आजी-माजी पदाधिकारी या सर्वांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले शाळेच्या निकालाची परंपरा कायम राखत यशाची वाटचाल चालूच ठेवली आहे त्यामुळे गावातील ग्रामस्थ मध्ये समाधान व्यक्त होत आहे इयत्ता आठवी ते दहावी वर्गाचे नवीन ॲडमिशन चालू आहे

Previous article७५ वर्षाच्या आजीबाईंनी जाणले निर्सगाचे मुल्य;पनतूच्या वाढदिवसानिमित्ताने बकोरी येथील डोंगरावर केले वृक्षारोपण
Next articleचौधरी पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलची दहावीच्या १००% निकालाची हॅटट्रिक