मोटरसायकलच्या डिकीतून दोन लाख ४० हजार लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद

किरण वाजगे,नारायणगाव

 येथील सेवानिवृत्त शिक्षकाच्या मोटरसायकलच्या डिकीतून दोन लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी घडली आहे.

या घटनेचे सीसीटीवी फुटेज खोडद रोड येथील एका दुकाना मधून मिळाले असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलासह अन्य एक जण मोटरसायकलच्या डिकीतून पिशवी काढताना दिसत आहे.

 याप्रकरणी नारायणगाव (ता. जुन्नर) येथील गुरुवर्य रा प सबनीस विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक दिलीप मारूती गोरडे ( सध्या रा. रांजणी ता. आंबेगाव) यांनी नारायणगाव पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे.

 त्यांनी गुरुवार दि. २३ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास येथील खोडद रस्त्यालगत असलेल्या बँक ऑफ इंडिया बँकेच्या शाखेतून दोन लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर त्यांनी पैसे असलेली पिशवी आपल्या मोटरसायकलच्या डिकी मध्ये ठेवली. मोटरसायकल नेत असताना अज्ञात चोरट्यांनी हातचलाखीने डिकी उघडून त्यातील रक्कम पळवून नेली. याबाबत अज्ञात चोरट्यांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास देशपांडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Previous articleदावडीच्या सरपंचांनी दिली गावासाठी रुग्णवाहिका    
Next articleबेकायदेशीर गोमांस वाहतूक करणाऱ्या वर नारायणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल