पुणे जिल्ह्रात रक्तदानात खेड तालुक्याचा विक्रम ; रक्तदात्यांनी तालुक्याचा वाढवला मान !

पुणे- खेड तालुका रक्तदानात जिल्हयात अव्वल ठरला असून,आमदार दिलीप मोहिते पाटील,उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण व तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केलेल्या अहवानाला रक्तदात्यांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे जिल्ह्यात खेड तालुक्याची मान व शान वाढली आहे.खेड तालुका हा हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जन्मभुमी असून,येथील जनता नेहमीच देशसेवेसाठी तत्पर असते याचा आज प्रत्यय आला आहे.

पुणे जिल्ह्यात भविष्यात रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेतला होता.यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा आदेश त्यांनी दिला होता. या आदेशानुसार बुधवार (ता. २२) प्रत्येकी एक रक्तदान शिबिर आयोजित केले होते भविष्यात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत ही शिबिरे सपंन्न झाली आहेत.

यामध्ये खेड तालुक्यात माहत्मा गांधी विद्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी खेड मा.विक्रांत चव्हाण व तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा रक्तदान शिबिरास उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला

.४२४रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रमी सहभाग नोंदवला आहे.खेड ४२४,इंदापुर १५९,आंबेगाव १२०,पुरंदर ९७,बारामती ९३,दौंड ४७,हवेली ५१,मावळ६९,मुळशी ९५,भोर ७७,वेल्हा ७१,जुन्नर ७९,शिरूर ५८ असे रक्तदान झाले असून,खेड तालुक्यातील विक्रमी रक्तदानाबद्दल आमदार दिलीप मोहिते पाटील,उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण व तहसीलदार यांनी सर्व प्रशासकीय अधिकारी व रक्तदात्यांचे आभार मानले आहेत!

Previous articleखेड येथील रक्तदान शिबीरात तब्बल ४२४ रक्तदात्यांनी केले रक्तदान
Next articleनारायणगाव ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीत आढळला माणसाचा पाय