खेड येथील रक्तदान शिबीरात तब्बल ४२४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

किरण वाजगे – खेड उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरूनगर (ता. खेड) येथील महात्मा गांधी विद्यालय येथे बुधवारी (दि. २२ रोजी) सर्व शासकीय कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात तब्बल ४२४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरामध्ये प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण व तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उदघाटन केले.


याप्रसंगी तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, महसूल नायब तहसीलदार संजय शिंदे, गटविकास अधिकारी अजय जोशी, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौधळ, राजगुरुनगर नगरपरिषदच्या मुख्याधिकारी निवेदिता घारगे,आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भगवान काकणे, आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणपत जाधव, चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता मधुकर भिंगारदिवे, खेड पोलीस निरीक्षक सतिश गुरव, चाकण ब्लड बँकचे संचालक चंद्रकांत हिवरकर, रक्तपेढी तंत्रज्ञ नितीन दौंडकर, रविराज भोकनळ, तलाठी संघटनेचे अध्यक्ष बलभीम पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शंकर ढोरे, महारेलचे मंदार विचारे, सर्व मंडल अधिकारी, तलाठी व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात विशेष सहकार्य केल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य सुनिल जाधव व चाकण रक्तपेढीचे संचालक चंद्रकांत हिवरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. राजगुरुनगर मंडल अधिकारी सविता घुमटकर, तलाठी बबन लंघे व मनिषा राऊत यांच्यासह पुरवठा शाखेच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्था पाहिली.

या शिबिरामध्ये खालील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला ते पुढीलप्रमाणे – महसूल विभाग (१४५), शिक्षण विभाग (१७६), नगरपरिषद विभाग (१४०), पंचायत समिती (२९), भूमी अभिलेख (२६), तालुका कृषी विभाग (४), वनविभाग (३८), दुय्यम निबंधक (१), सहायक निबंधक (३) व ईतर नागरिक (७९) अशा एकूण ६५९ इच्छुक नागरिकांनी नोंदणी केली. मात्र त्यातील २३३ जण विविध कारणांमुळे अपात्र ठरले. एकुण ४२४ रक्तदात्यांनी यशस्वीपणे रक्तदान केले.

Previous articleवंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका अध्यक्षपदी जुबेर शेख यांची निवड
Next articleपुणे जिल्ह्रात रक्तदानात खेड तालुक्याचा विक्रम ; रक्तदात्यांनी तालुक्याचा वाढवला मान !