वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका अध्यक्षपदी जुबेर शेख यांची निवड

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुका वंचित बहुजन आघाडी च्या अध्यक्षपदी नारायणगाव येथील जुबेर अस्लम शेख यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार ( दि. २१) रोजी जुन्नर तालुका वंचित बहुजन आघाडीची कार्यकारीणी पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद भालेराव यांनी प्रसिद्ध केली.

“जुन्नर तालुक्यात गाव तेथे शाखा स्थापन करुन,तळागाळातील शोषित,वंचित घटकांपर्यंत सत्तेच्या चाव्या हाती याव्यात यासाठी प्रयत्न करुन बहुजन समाजाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करणार असल्याचे, तसेच आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषद आदी निवडणूका स्वबळावर लढविणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका नवनियुक्त कार्यकारीणी पुढीलप्रमाणे

जुबेर अस्लम शेख,अध्यक्ष, फिरोज पटेल उपाध्यक्ष, संतोष डोळस,उपाध्यक्ष विशाल रोकडे,उपाध्यक्ष महेश तपासे,महासचिव सागर जगताप,महासचिव अल्पेश सोनवणे,सचिव श्रीकांत कसबे, सचिव. विनायक रणदिवे, सहसचिव आरीफ पटेल, सहसचिव संदेश वाव्हळ , प्रसिद्धी प्रमुख नितीन साळवे,संघटक अशोक डोके,संघटक सुरेश आल्हाट, संघटक शांताराम घोडे,संघटक मंदार कोळंबे,संघटक नवनाथ सोनवणे,संघटक मुबारक जमादार,संघटक जुन्नर तालुका नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडीबद्दल वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद भालेराव , उपाध्यक्ष हिरामण वाघमारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सिमाताई भालेसईन, सचिव गिरीराज वाव्हळ, सहसचिव गणेश वाव्हळ, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा निलम खरात, कार्याध्यक्ष जावेद मोमीन, प्रा. किशोर चौरे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.

Previous articleवाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई
Next articleखेड येथील रक्तदान शिबीरात तब्बल ४२४ रक्तदात्यांनी केले रक्तदान