वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई

मंचर- अवसरी खुर्द गावच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर मंचर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये दोन ब्रास वाळू व दोन लाख किमतीचा टेम्पो जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली. संदर्भात पोलिस जवान सोमनाथ गवारी यांनी तक्रार दाखल केली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना गुप्त बातमी दारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार मंचर गावच्या हद्दीत पुणे-नाशिक रस्त्यावर वाळू भरलेला टेम्पो जाणार आहे, अशी माहिती मिळाली असता त्या नुसार पोलीस नाईक एच. बी. मडके, पोलीस नाईक एम. बी. लोखंडे, पोलीस जवान एस. के. कायडोके, एस.डी. कारभाळ यांनी काल दि 20 रोजी साडेबाराच्या सुमारास मंचर बसस्थानकासमोर नाका-बंदी दरम्यान एका टेम्पोला थांबवण्याचा इशारा केला असता त्याने वाहन थांबवले नाही, सदर वाहनाचा पाठलाग करताना अवसरी खुर्द गावच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर बोरवाडी येथील बाबा का ढाबा येथे टेम्पो पाठलाग करून थांबविले असता वाहन चालकाने स्वतःचे नाव अर्जुन गोविंद आडे (वय 36 रा.घारगाव,, ता.संगमनेर, जि अहमदनगर) असल्याचे सांगितले त्याच्याकडे चौकशी केली असता वाळूची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरली नसल्याचे त्यांनी सांगितले सदर टेम्पो नंबर एम एच 04 एफ.यु 77 87 असून त्याचा मालक अनिकेत मधुकर मोरे (रा.घारगाव ता.संगमनेर जि. अहमदनगर) असल्याचे सांगितले सदर वाळू संदर्भात कोणत्याही प्रकारची रॉयल्टी असल्याची पावती नसल्याकारणाने मंचर पोलिसांनी दोन ब्रास वाळू अंदाजे किंमत 14000 व दोन लाख रुपये किमतीचा टेम्पो असा दोन लाख 14 हजार रुपये किमतीचा ऐवज ताब्यात घेतला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सोम शेखर शेटे करत आहेत.

Previous articleमाणसातला परमेश्वर म्हणजेच आमच्या माऊली सुनेत्रावहिनी पवार
Next articleवंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका अध्यक्षपदी जुबेर शेख यांची निवड