माणसातला परमेश्वर म्हणजेच आमच्या माऊली सुनेत्रावहिनी पवार

अमोल भोसले, पुणे

प्रत्येकाची काळजी घेत, सर्वांना समान वागणूक देत, शेकडो लोकांच्या आयुष्यात दिपज्योत बनून त्यांना मार्गदर्शक करणाऱ्या वहिणीसाहेब. आताच्या या कोरोनाच्या काळात देखील, अनेक गरजू लोकांना मदत केली पण त्याची प्रसिद्धी कुठे न करता मानवसेवा हाच खरा धर्म मानुन शेकडो कुटुंबाचा आधार बनल्या. अनेकांना वैदयकीय मदत पोचवली, कोरोनाच्या काळात पहिल्या दिवसापासून अनेक सामाजिक संस्थना पाठबळ देऊन, हजारो गरजू लोकांची, विद्यार्थ्यांची व जेष्ठ नागरिकांची जेवणाची व्यवस्था केली. अनेक कुटुंबाना वहिनी म्हणजे एक मोठा आधार आहेत. प्रत्येक व्यक्तीशी वहिणींचे एक वेगळे नाते आहे.

प्रत्येकाला वहिनी या आपल्या आहेत असे वाटते, याचे कारण म्हणजे त्या प्रत्येकाला आपुलकीने वागवतात, पण एक मात्र आहे त्यांना चुकीच्या गोष्टी खपत नाहीत, नेहमीच चांगच्या कामाचे कौतुक करणार, पण चुकीच्या गोष्टींची कधीच पाठराखण करणार नाही. अतिशय मायाळू पण तितक्याच कडक स्वभावाच्या,शिस्तबद्ध आणि वेळेला महत्त्व देणाऱ्या वहिणीसाहेब. मानवी संवेदना आणि सामाजिक जाणिवेचं ज्वलंत आणि जीवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच सुनेत्रावहिनी पवार.

Previous article१८ आणि १९ डिसेंबर रोजी उरुळी कांचन येथे मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन : एस.एम.देशमुख
Next articleवाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई