अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचा यशाची परंपरा राखत यावर्षीही 100% निकाल

Ad 1

बाबाजी पवळे

आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर या विद्यालयाने आपली यशाची परंपरा राखत यावर्षीही 100% निकाल लावला असून 190 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असल्याची माहिती प्राचार्य रमेश हळदे व पर्यवेक्षक जे.ए.सुपेकर यांनी दिली.

मागील अनेक वर्षाची यशाची परंपरा राखत याहीवर्षी विद्या विकास मंदिर या विद्यालयाने इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्यात यश मिळवले असून पोखरकर ओंकार नवनाथ 97.20%, पोखरकर चिन्मय संदीप 95.40%,बोराडे आदिती दत्तात्रय 95.40%,मडके अवधुत चंद्रकांत 95.20%,थोरात मानसी विजय 94.60%,गोरडे तेजस संतोष94.40% यावर्षी 190 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे 36 विद्यार्थी आहेत. 80% पेक्षा जास्त गुण 100 विद्यार्थ्यांना आहेत,अशी माहिती प्राचार्य.हळदे आर.बी.आणि पर्यवेक्षक सुपेकर जे.ए.यांनी दिली.संस्थेचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटीलकार्याध्यक्ष गणपतराव हिंगे ,सचिव वसंतराव हिंगे ,सर्व संचालक,विश्वस्त ,ग्रामस्थ,पालकतसेच शाळा व्य.समितीचे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.