सिद्धेश्वर विद्यालयाचा इयत्ता 10 वी चा निकाल 96 टक्के

दिनेश पवार-दौंड (,प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 96 टक्के लागला असून,गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे
प्रथम :- कु.डाळींबे ऋतुजा आबा- 91.40%
द्वितीय:-कु.नागवे राहुल गोरख-90
तृतीय:-कु.आवचर मानसी वासुदेव-89.20%
तृतीय:-कु.कापसे सुहानी संजय-89.20%
वरील सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे सिद्धेश्वर शिक्षण संस्था देऊळगाव राजे चे अध्यक्ष-मा.श्री.आप्पासाहेब पवार,उपाध्यक्ष-मा.श्री.आनंदराव गिरमकर, खजिनदार-मा.श्री.संदिपशेठ नय्यर,सचिव-मा.श्री.हरिश्चंद्र ठोंबरे, प्राचार्य-मा.श्री.आदिनाथ थोरात यांनी तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले.

सिद्धेश्वर विद्यालयाची यशस्वी निकालाची परंपरा कायम आहे, याही वर्षी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे, शाळेचा इयत्ता 10वी चा निकाल चांगल्या प्रकारे लागल्यामुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

Previous articleजिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी वाकळवाडी गावातील विकासकामांची केली पाहणी
Next articleअवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचा यशाची परंपरा राखत यावर्षीही 100% निकाल