राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर घेणार जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

            पुणे, दि. १८ सप्टेंबर, २०२१ (विमाका वृत्तसेवा);-पुणे महसूल विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या पाच जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या कामांची आढावा बैठक सोमवार २० सप्टेंबर २०२१ रोजी दु. २ वाजता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या झुंबर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

            या बैठकीत सन २०१८-१९ ते सन २०२० २१ या ३ आर्थिक वर्षामध्ये घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेमधून कोविड- १९ प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत कोणती कामे घेण्यात आली आणि या कामांवर किती निधी खर्च झाला याबाबत जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय आढावा घेतला जाणार आहे.

Previous articleधक्कादायक – चाकणमध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, एका आरोपीला अटक, एक फरार
Next articleआरोग्य विभागातील परीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे