धक्कादायक – चाकणमध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, एका आरोपीला अटक, एक फरार

चाकण- अल्पवयीन १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकटे गाठून तिच्यावर जबरदस्तीने केलेल्या बलात्कारातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे.हा प्रकार डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान चाकण येथील राक्षेवाडीमध्ये तसेच भामा नदीच्या काठी घडला

या प्रकरणी अक्षय खडे (वय २०, रा. कोळवाडी, घोडेगाव, ता. आंबेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा मित्र सुनिल मधे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन १२ वर्षाची मुलगी घरात एकटी असताना अक्षय खडे व सुनिल मधे या दोघांनी तिच्यावर जबरदस्तीने व आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिला वाटेत वेळोवेळी गाठून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. या अत्याचारातून ती गर्भवती राहिली होती. तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला.त्यानंतर तिच्या आईने मंचर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

Previous articleयशवंत सहकारी साखर कारखान्याला आजी माजी सत्ताधारी विसरले
Next articleराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर घेणार जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा