गांजा विकताना महिलेला अटक 

अमोल भोसले,उरुळी कांचन

आशा बापू सोनावणे (वय ४०, रा. सखाराम नगर, थेऊर) असे आरोपी महिलेचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस हवालदार बोमादंडी, शेळके, साळुके, खेवलकर, बास्टेवाड, महेश साळुंके हे शुक्रवारी पेट्रोलिंग करत थेऊर येथील सखाराम नगरमध्ये आले. यावेळी ३.४० च्या सुमारास आशा सोनावणे ही संशयीतरीत्या उभी असलेली दिसली. पोलिसांनी तिच्या हालचालीकडे लक्ष ठेवले.

यावेळी ती गांजा विकत असल्याचे आढळले. पोलिसांचा संशय आल्याने ती पळण्याच्या प्रयत्नात होती; मात्र पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. तिची झडती घेतली असता, तिच्या जवळील प्लास्टिकच्या पिशवीत १ किलो ५०० ग्रॅम गांजा आढळला. जवळपास ३० हजार रुपयांचा हा गांजा आहे. पोलिसांनी सोनावणे हिला न्यायालयासमोर हजर केले. तिला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी हे करत आहेत.

Previous articleखरेदीखताची नोंद करताना मूळ मालकाचे नाव सातबाऱ्यावरून गायब
Next articleवन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या हवेली तालुकाध्यक्षपदी सुधीर गायकवाड यांची निवड