पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बकोरी येथील देवराई-वनराई प्रकल्पात वृक्षारोपण

गणेश सातव,वाघोली

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष,हवेली यांच्यावतीने बकोरी येथील माहिती सेवा समितीच्या देवराई-वनराई प्रकल्पावर २०० पर्यावरण पूरक स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात आली.

यात वड,पिंपळ,पुत्रंजीवा, ताम्हण,जांभूळ, बेल,बकुळ आदी वृक्षांचे रोपन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी हवेली तालुका भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदिपआप्पा भोंडवे,भा.ज.प प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेश कुटे,वाघोली ग्रामपंचायत सदस्य व पक्षाच्या सहकार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश सातव,वाघोली भा.ज.प शहराध्यक्ष केतन जाधव,माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे,महिला पदाधिकारी यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleपै.संदीप भोंडवे यांची भारतीय जनता पार्टीच्या हवेली तालुका अध्यक्षपदी निवड
Next article‘जगदंब प्रतिष्ठान’ आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे रंजनाताई कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन