पै.संदीप भोंडवे यांची भारतीय जनता पार्टीच्या हवेली तालुका अध्यक्षपदी निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

लोणीकंद ( ता.हवेली) येथील पै.संदीप उत्तमराव भोंडवे यांची हवेली तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

याप्रसंगी माजी मंत्री संजय भेगडे, आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे, महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद धर्मेंद्र खांडरे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष सुनिल कांचन, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, पंचायत समिती सदस्य श्याम गावडे, हवेली तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव पाटील, वाघोली भाजप शहराध्यक्ष केतन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम तालुक्यातील आजी माजी पदाधिकाऱ्यांना सर्वांना बरोबर घेऊन करणार असल्याचे नुतन तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सांगितले. कुस्ती क्षेत्रात तसेच छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळा या माध्यमातून भोंडवे यांचे काम चालू होते.

Previous articleभारती शेवाळे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बकोरी येथील देवराई-वनराई प्रकल्पात वृक्षारोपण