भारती शेवाळे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

शेवाळवाडी (ता.हवेली) येथील राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी भारती युवराज शेवाळे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निवड केली. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते भारती शेवाळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, माजी नगरसेवक काका चव्हाण आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपाध्यक्षा, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला कॉग्रेस निरिक्षक, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या जिल्हा मुख्य प्रचारक, हवेली तालुका यशस्विनी सामाजिक अभियान समन्वयक म्हणून शेवाळे यांनी यापूर्वी काम पाहिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विचार तळागाळातील सर्व सामान्य महिलांंन पर्यंत पोचविण्याचे काम करणार असे नुतन महिला जिल्हा अध्यक्षा भारती शेवाळे यांनी व्यक्त केले.

Previous articleसुनील कांचन यांची भाजपाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
Next articleपै.संदीप भोंडवे यांची भारतीय जनता पार्टीच्या हवेली तालुका अध्यक्षपदी निवड