सुनील कांचन यांची भाजपाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

येथील उरुळी कांचनचे माजी उपसरपंच – हनुमान ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन सुनिल सुभाष कांचन-पाटील यांंची पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी निवड केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकरणी सदस्य रोहिदास उंद्रे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, प्रविण काळभोर, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, धर्मेंद्र खांडरे, पश्चिम महाराष्ट्र व्यापारी विभागाचे अध्यक्ष विकास जगताप, जिल्हा सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा अनिल सातव, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष अमोल शिवले, शहर अध्यक्ष अमित कांचन, गणेश चौधरी सह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरिष्ठांनी टाकलेला विश्वास पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करु असे मत नुतन जिल्हा उपाध्यक्ष सुनिल कांचन यांनी सांगितले.

Previous articleमध्य प्रदेशात पत्रकारांसाठी विमा योजना,महाराष्ट्रात मात्र पत्रकारांची घोर उपेक्षा – एस.एम.देशमुख
Next articleभारती शेवाळे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड