शिवराज ग्रुपच्या सामाजिक कार्याचा वर्ल्ड बुक रेकॉर्ड लंडन तर्फे सन्मान

चाकण- शिवराज ग्रुपने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत वर्ल्ड बुक रेकॉर्ड लंडन तर्फे शिवराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोतीराम सावंत व सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला .

शिवराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत सावंत हे खेड तालुक्यातील चिखलगाव या गावाचे सुपुत्र आहेत .ते सरस्वती विद्यालय औदर या शाळेचे माजी विद्यार्थी आहे . तसेच ते स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

समाजकार्य करणे ही काळाची गरज आहे आणि समाजकार्य करत असताना स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असल्याने विद्युत क्षेत्रात मोठ्या प्रमाणातील अडीअडचणी आणि खेडोपाडी वीज पोहचत नाही अशा गावांमध्ये मदत करून त्या गावांचा वीजपुरवठा कशाप्रकारे सुरळीत होईल अशाप्रकारची अनेक समस्या सोडवण्याची कामे व मदत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला .

सरस्वती विद्यालय व समस्त ग्रामस्थांच्यावतीने चंद्रकांत सावंत यांचा सन्मान करण्यात आला . त्यावेळी त्यांनी प्रशालेस २०११० रुपये किंमतीचे लाईट फिटींगसाठी इलेक्ट्रिक साहित्य विद्यालयास मदत म्हणून उपलब्ध करून दिले . याबद्दल सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक टाकळकर सर व सर्व शिक्षक वृंद , समस्त ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले

Previous articleलंडन मध्ये भारतीय युवकांनी साजरा केला गणेशोत्सव
Next articleमध्य प्रदेशात पत्रकारांसाठी विमा योजना,महाराष्ट्रात मात्र पत्रकारांची घोर उपेक्षा – एस.एम.देशमुख