महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघातर्फे सुप्रिया सुळे यांना निवेदन

दिनेश पवार,दौंड

महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघातर्फे खासदार सुप्रिया सुळे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले, पोलीस पाटील गावपातळीवर कायदा,सुव्यवस्था,शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना महत्वाची मदत करणे,कोविड च्या कालावधीत गावात महत्वाची भूमिका बजावण्याचे काम पोलीस पाटील करत आहेत,आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात अशी मागणी निवेदन सादर करून उपस्थित पोलीस पाटील यांनी केली आहे, यावर या मागण्यां मान्य होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख योगेश बोबडे,पुणे जिल्हा महिला आघाडी सदस्य नीता वाघमारे,उपाध्यक्ष सचिन पोळ,मा.अध्यक्ष संभाजी वाघमारे,कार्यकारी अध्यक्ष कल्पना लोणकर, कार्याध्यक्ष महेश लोंढे,कार्यकारणी संघटक प्रभाकर पाळेकर,सदस्य अश्विनी बगाडे, मा.तालुका उपाध्यक्ष मदन गोरे आदी उपस्थित होते

Previous articleदौंड तालुक्यात अनेक तरूणांनी केला शिवसेनेत प्रवेश
Next articleमहाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघातर्फे खा.सुप्रिया सुळे यांना निवेदन